अयोध्येतील राम मंदिर जगातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र होईल
सार्वमत

अयोध्येतील राम मंदिर जगातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र होईल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीकांत जोशी

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

अयोध्येत जेथे प्रभुरामचंद्राचा जन्म झाला त्याच जागेवर हे भव्य राममंदिर उभारले जात आहे. हिंदू समाजाने 500 वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न आता पूर्ण होणार आहे. प्रभुरामचंद्र पुन्हा धर्तीवर अवतारणार असून यामुळे देशात पुन्हा रामराज्य येणार आहे. याचा प्रत्तेक हिंदूला आनंद होत आहे. 500 वर्षाच्या या लढ्यात शेकडो हजारोंना हौताम्य आले आहे.

त्यंच्या आत्म्याला शांती प्राप्त होईल. करोडो भाविकांच्या भावना असलेले अयोध्येतील हे राम मंदिर संपूर्ण जगातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीकांत जोशी यांनी केले.

अयोध्येत होत असलेल्या प्रभूरामचंद्राच्या भव्य मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त नगर शहरात सर्वत्र उत्सहात व भक्तिपूर्ण वातावरणात विविध कार्याक्रमंचे आयोजन करण्यात आले होते. गौरीशंकर मित्र मंडळाच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालया समोर उभारण्यात आलेल्या प्रभू रामचंद्रांच्या भव्य मूर्तीचे पूजन व महाआरती करण्यात आली.

यावेळीसंघाचे शहर सहसंघचालक वाल्मिक कुलकर्णी, शहर कार्यवाह हिराकांत रामदासी, भाजप शहराध्यक्ष महेंद्र गंधे, कमलेश वैकर, एल.जी. गायकवाड आदींसह भाविक उपस्थित होते. यावेळी जय श्रीराम.... जय श्रीराम.... अशा जोरदार घोषणा सर्वांनी देऊन फाटके वाजवून व पेढे वाटून आनंदात हा भूमिपूजन सोहळा साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केशावार्पण या जिल्हा कार्यालयावर भगवे झेंडे लाऊन फुलांची सजावट करण्यात आली आहे.

महेंद्र गंधे म्हणाले, कारसेवकांचे बलिदान व्यर्थ न जाता आज हे राम मंदिर उभे राहत आहे. लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांनी गेल्या 30 वर्ष कष्ट घेऊन हे प्रत्यक्षात आणले आहे. शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा. दयावेळी पोर्णिमा नामदे, आरती आढाव, अक्षय शिंदे, महेश कापरे, सागर शिंदे, सुरज नामदे, धीरज शिंदे, शुभम शिंदे आदि उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com