अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्याध्यक्षपदी अविनाश आपटे

अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्याध्यक्षपदी अविनाश आपटे

श्रीरामपूर | प्रतिनिधी | Shrirampur

महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) श्रीरामपूर (Shrirampur) तालुका कार्याध्यक्षपदी कामगार नेते अविनाश आपटे (Avinash Apate) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

तालुका कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अविनाश आपटे यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष प्राचार्य पोपटराव शेळके (Popatrao Shelke) होते. प्रास्ताविक व स्वागत सुनील साळवे यांनी केले.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्याध्यक्षपदी अविनाश आपटे
Modi Cabinet Expansion : जाणून घ्या, मोदींच्या नव्या मंत्री मंडळात वर्णी लागलेल्या महाराष्ट्रातील चार खासदारांबद्दल

अविनाश आपटे यांनी गेल्या चार दशकामध्ये आरोग्य, शिक्षण, कामगार कल्याण सामाजिक, साहित्य,कला, संस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. समाजामध्ये एकात्मता, पुरोगामी विचार रुजविण्यासाठी आपटे नेहमीच अग्रेसर असतात. गरजू, गोरगरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी ते तन, मन, धनाने कार्य करतात. अविनाश आपटे विविध संस्थांवर पदाधिकारी म्हणून यशस्वीपणे कार्यभार सांभाळत आहेत. त्यांच्या निवडीमुळे समितीचे कार्य गतिमान होईल असा विश्वास सुनील साळवे यांनी व्यक्त केला.

निवडीनंतर झालेल्या सत्काराला उत्तर देताना अविनाश आपटे म्हणाले, अनिसमध्ये अनेकवर्षं काम केले नरेंद्र दाभोलकर, निळू फुले यांच्याशी संबंध आला. कोणाच्याही श्रद्धेला तडा जाणार नाही मात्र अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सार्वत्रिक प्रयत्न केले जाणार असल्याचे अविनाश आपटे यांनी सांगितले. आभार सचिव प्रवीण साळवे यांनी मानले.

अविनाश आपटे यांच्या निवडीचे पोपटराव शेळके, सुनील साळवे, प्रमोद पत्की, प्रवीण साळवे, शोभा शेंडगे, सविता साळुंके, राजेंद्र केदारी, बाळासाहेब पाटोळे, सुखदेव शेरे, लहानू त्रिभुवन, नितीन राऊत, पराग कारखानीस, ॲड. अश्विनी लबडे, प्रतिज्ञा पत्की, प्राध्यापक सुप्रिया साळवे, श्रावण भोसले, साहेबराव रकटे, प्रेमनाथ सोनुने, विश्वास भोसले आदींसह सामाजिक, साहित्य, शैक्षणिक, राजकिय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com