औरंगाबाद रोडवर शहर बस सेवा सुरू करण्याचे महापौरांचे आदेश

औरंगाबाद रोडवर शहर बस सेवा सुरू करण्याचे महापौरांचे आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जुन्या बस स्थानकावरून औरंगाबाद रोड मार्गे गुलमोहर रोड पर्यंत तात्काळ शहर बस सेवा सुरू करण्यात यावी असे आदेश महापौर रोहिणी शेंडगे यांनी महापौरांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाचे शासकीय विश्रामगृहाच्यामागे स्थलांतर झाले आहे. जिल्हाभरातून नागरिक कामासाठी येथे येतात. तसेच मनपाचे मुख्यालय, जलसंपदा, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालय अधिक महत्त्वाची शासकीय कार्यालय याच मार्गावर आहेत.

नगर-औरंगाबाद रस्त्यावर बहुतांश शासकीय कार्यालये आल्यामुळे नागरिकांना याठिकाणी येण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी शहर बससेवा जुने बस स्थानक ते जीपीओ चौक ते डीएसपी चौक ते शासकीय विश्राम गृह ते गुलमोहर रोड यामार्गे सुरु करावी. संबंधितांना याबाबत तत्काळ सूचना द्याव्यात, असे आदेश महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिले आहेत.

Related Stories

No stories found.