अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांची औरंगाबाद येथे शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेचे उपसंचालक म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे.

शालेय शिक्षण विभागाने बुधवारी राज्यातील शिक्षण उपसंचालकांच्या पदोन्नतीचे आदेश काढले. त्यात काठमोरे यांना औरंगाबादला नियुक्ती मिळाली आहे. पदोन्नती यादीत गेल्या चार महिन्यांपूर्वीच त्यांचे नाव होते. मात्र, शासनाने त्यांना अद्याप नियुक्ती दिलेली नव्हती.

काठमोरे हे मूळचे पाथर्डी तालुक्यातील असून 2017 पासून शिक्षणाधिकारी म्हणून नगरमध्ये कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात शिक्षण विभागात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न झाले. जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा त्यांनी आयोजित केल्या. याशिवाय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांचे कवितासंग्रह त्यांनी प्रकाशित केले.

लॉकडाऊनमध्ये शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्वाध्यायपुस्तिका वाटप केल्या. याशिवाय मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेण्याबाबत त्यांनी विशेष काम केले.