एसीबीच्या दोन निरीक्षकांची बदली

एसीबीच्या दोन निरीक्षकांची बदली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Bribery Prevention Department) पोलीस निरीक्षक श्याम पवरे (Police Inspector Shyam Paware) व दीपक करांडे (Deepak Karande) यांची अन्यत्र बदली (Transfer) झाली आहे.

पवरे यांची महामार्ग सुरक्षा पथकात तर करांडे यांची कोल्हापूर (Kolhapur) परिक्षेत्रात बदली झाली आहे. या दोघांना नुकतेच कार्यमुक्त करण्यात आले. त्याचबरोबर पोलीस हवालदार तनवीर शेख व पोलीस नाईक प्रशांत जाधव यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची यापूर्वीच पोलीस अधीक्षक कार्यालयात बदली झालेली आहे.

त्यांच्याजागी पोलीस हवालदार संतोष शिंदे व बाबासाहेब कराड यांची प्रतिनियुक्तीवर नेमणूक करण्यात आली. कोणीही लोकसेवक सर्वसामान्य जनतेला त्यांचे काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, अहमदनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर (Deputy Superintendent of Police Harish Khedkar) यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com