अगस्ति कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले यांचा राजीनामा

अगस्ति कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले यांचा राजीनामा

अकोले |प्रतिनिधी| Akole

अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले यांनी आपल्या कार्यकारी संचालक पदाचा राजीनामा दिला. श्री घुले यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्या मुळे खळबळ उडाली आहे.अगस्ति सहकारी साखर कारखान्यामधील अंतर्गत कुरघोडी च्या राजकारणाचा ते बळी ठरले असल्याची चर्चा काल दिवसभर होती.

अगस्ति कारखाण्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक व्ही एस बाविस्कर यांच्या सेवा निवृत्ती नंतर श्री घुले यांनी कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला होता.त्यापूर्वी ते जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे 15 वर्ष कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत होते.श्री घुले यांनी अगस्ति च्या कार्यकारी संचालक पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर कामगार वर्गाला शिस्त लावली.

दोन वर्षांपूर्वी 5 लाख 76 हजार मेट्रिक टन उसाचे सर्वाधीक गळीत झाले होते. तर यावर्षीही अगस्ति च्या इतिहासात 6 लाख 15 हजार मेट्रिक टनाचे उच्चांकी गाळप करण्यात आले.2 मे ला या वर्षीच्या गळीत हंगामाची सांगता झाली. अडीच हजार क्षमतेच्या कारखान्याला महाराष्ट्र शासनाने साडे तीन हजार मेट्रिक टन ऊस गाळप क्षमता वाढीचा औद्योगिक परवाना दिला. त्यांच्या कारकिर्दीत ही अगस्तिच्या इथेनॉल प्रकल्पाची उभारणी झाली.

गेल्या काही दिवसांपासून कारखान्याचे संदर्भात आरोप प्रत्यारोप सुरू असले ,कारखान्याच्या विरुद्ध काही जणांनी तक्रारी केल्या तरी कारखान्याच्या दैनंदिन कामकाजावर याचा कोणताही परिणाम श्री घुले यांनी होऊ दिला नाही. माजी मंत्री ,कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव पिचड व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा कारखान्याचे उपाध्यक्ष सिताराम पाटील गायकर व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी संचालक घुले हे सर्व अधिकारी-कर्मचारी वर्गाला सोबत घेऊन काम करत होते.स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांशी सवांद साधत त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्परता दाखवत होते.

श्री घुले यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने शेतकरी, कामगार वर्गात नाराजीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात श्री घुले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी श्री घुले यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला' सार्वमत' शी बोलताना दुजोरा दिला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com