ऑगस्टचे वेतन, निवृत्तीवेतन गणेशोत्सवापूर्वी

ऑगस्टचे वेतन, निवृत्तीवेतन गणेशोत्सवापूर्वी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य शासकीय कर्मचार्‍यांचे ऑगस्ट 2022 पेड इन सप्टेंबर महिन्याचे वेतन / निवृत्तीवेतन गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्याबाबतचे परिपत्रक वित्त विभागाकडून जारी झाले आहे. गणेशोत्सवाची सुरुवात31 ऑगस्ट 2022 पासून होत आहे.

उत्सव साजरा करताना राज्य शासकीय अधिकारी /कर्मचारी त्याचबरोबर निवृत्तीवेतनधारक कर्मचार्‍यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी ऑगस्ट पेड इन सप्टेंबर 2022 महिन्याचे वेतन गणेशोत्सव सणापूर्वी प्रदान करण्यात येणार आहे. हा निर्णय राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त व अनुदानित शेक्षणिक संस्था व कृषी व कृषीत्तेर विद्यापीठांतील अधिकारी / कर्मचार्‍यांना लागू राहणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com