पुलावरून पाणी जात असतांना ट्रक नेण्याचा केला प्रयत्न आणि...; पुढे काय झालं पाहा VIDEO

पुलावरून पाणी जात असतांना ट्रक नेण्याचा केला प्रयत्न आणि...; पुढे काय झालं पाहा VIDEO

शेवगाव | प्रतिनिधी

काल झालेल्या पावसामुळे ओढे-नदया पातळी ओलांडुन वाहु लागल्याने नदया लगतच्या परिसरात वेगाने पाणी घुसुन पुरमय स्थिती निर्माण झाली. चोहीकडे पाणीच पाणी झाले. काही घरे, अनेक जनावरे, घरांतील साहित्य या पुरात वाहुन जाऊन मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव येथील भगिरथी नदीवरील पुलावर पहाटे तीन ते चारच्या सुमारास पुला वरून पाणी जात होते. अशा स्थितीत एकाने या पुलावरून ट्रक नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याचा ट्रक अडकला.

पुराचे पाणी ट्रकच्या वर आले. त्याने ग्रामस्थांकडे मदतीची याचना केली. तो सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ट्रकवरच उभा होता. अखेर सकाळी ग्रामस्थांनी दोरीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com