चोरीच्या प्रयत्नातील चार महिलांना अटक

राशीनच्या आठवडे बाजारात पोलिसांची कारवाइ
चोरीच्या प्रयत्नातील चार महिलांना अटक

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्स व पिशवीत हात घालून चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चार महिलांना कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले.

अरणगाव ता. जामखेड, पाथरूड ता. भूम, नेवासा फाटा, येथील या संशयित महिला आहेत. 16 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास संबंधित चार महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बाजारात विक्रेत्यांजवळ काही ग्राहक व महिला भाजीपाला खरेदी करत असताना या महिलांभोवती घोळका करून व त्यांचे लक्ष विचलित करून त्यांच्याजवळ असणार्‍या पर्स व पिशवीत हात घालून चोरीचा प्रयत्न करताना चार महिला आढळल्या.

त्यावेळी कर्जत पोलीस भाजी विक्रेते सुभाष सायकर, तुळशीराम सायकर, संजय राऊत आदींनी महिला कॉन्स्टेबल यांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेत असताना त्यातील दोन महिला पळून जाऊ लागल्या. मात्र पाठलाग करून महिला कॉन्स्टेबल पुरी यांनी त्यांना आपल्या ताब्यात घेत राशीन पोलीस दूरक्षेत्र येथे आणले. पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांत कलम 379, 511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 महिलांवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com