जीवे मारण्याचा प्रयत्न, आरोपीस सक्तमजुरी

नगरमधील घटना || जिल्हा न्यायालयाचा निकाल
जीवे मारण्याचा प्रयत्न, आरोपीस सक्तमजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याप्रकरणी आरोपीला (Accused) न्यायालयाने तीन वर्ष सक्त मजुरी (Three years hard labor) व पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. यश मनोज लोढा (रा. पटवर्धन चौक, नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील (District and Sessions Judge B.M. Patil) यांनी हा निकाल (Result) दिला. सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकिल अनिल सरोदे (Additional Public Prosecutor Anil Sarode) यांनी काम पाहिले.

लोढा याने निखिल अशोक उपाध्ये यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना मार्च 2019 मध्ये घडली होती. उपाध्ये यांच्या नवीपेठ येथील घरसंचार गृहउपयोगी वस्तू या दुकानातून घेतलेल्या वस्तूवरून लोढा व उपाध्ये यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी लोढा याने उपाध्ये यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

उपाध्ये यांच्या फिर्यादीवरून लोढाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल (Filed a Crime) केला होता. या गुन्ह्याचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्यात फिर्यादी पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. खटल्यात सुनावणीदरम्यान पैरवी अधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश जोशी यांनी मदत केली.

Related Stories

No stories found.