प्रेमात अडसर पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न

गुन्ह्यातील आरोपी पतीला 3 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
प्रेमात अडसर पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न

सोनई (वार्ताहर)-

प्रेम करण्यात अडसर ठरते म्हणून पत्नीला विषारी औषध पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपावरून

सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील आरोपी पतीला 3 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सदर आरोपीला अटक करून नेवासा न्यायालयात हजर केले होते. मंगल अनिल खरात (वय.25) धंदा-शेती घरकाम रा. भेंडा ता. नेवासा हल्ली मुक्काम वांजोळी ता. नेवासा हिने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की 29.नोव्हेंबर रोजी सकाळी आरोपी अनिल पोपटराव खरात रा. वांजोळी शिवार याने फिर्याद पत्नी मंगल खरात ही आरोपीच्या प्रेम प्रकरणात अडसर होत असल्याचे कारणावरून मंगल चे केस ओढून एक हात धरून मारहाण करीत तुला एकदाचे संपवूनच टाकतो असे म्हणून गवताला मारण्याचे विषारी औषध बळजबरीने पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 307, 323 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अनिल खरात यास अटक करून नेवासा न्यायालयात हजर केले असता त्याला 3 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. प्रभारी सहाय्यक निरीक्षक रामचंद्र करपे, सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात पुढील तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com