महिलेला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न

कुठे घडली घटना
महिलेला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा (Crime of Molestation) मागे घेण्यासाठी तरूणाने नोकरदार महिलेला बंदुकीचा धाक (Fear of guns to the woman) दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न (Try Killed) केला. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास भिंगार पोलीस ठाणे (Bhingar Police Station) हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी पिडीत महिलेने पोलीस ठाण्यात (Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात खूनाचा प्रयत्न, आर्म ऍक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगेश रामचंद्र घायतडक (वय 39 रा. माधवबाग, बालाजी कॉलनी, भिंगार) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक (Arrested) केली आहे. फिर्यादी यांनी घायतडक याच्याविरोधात दोन वर्षांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा (Crime of Molestation) दाखल केला आहे. शनिवारी रात्री घायतडक हा त्याच्याकडील दुचाकीवरून बंदुक घेऊन फिर्यादीच्या घरी गेला. घरासमोर फिर्यादीच्या दिशेने बंदुक धरून, तू माझ्याविरूद्ध दाखल केलेला गुन्हा मागे घे, नाही तर तुला व तुझ्या नवर्‍याला सोडणार नाही, असे म्हणत फिर्यादीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, उपनिरीक्षक बेंडकोळी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी आरोपी घायतडक याला अटक केली असून पुढील तपास उपनिरीक्षक बेंडकोळी करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com