नगरला येणारा ऑक्सिजनचा टँकर अडविण्याचा पुणेरी डाव हाणून पाडला
File Photo

नगरला येणारा ऑक्सिजनचा टँकर अडविण्याचा पुणेरी डाव हाणून पाडला

मुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील नेत्यांनी फटकारल्यावर ऑक्सिजन टँकर पोहचला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनावर उपचार करत असताना आता रेमडेसिवीरनंतर ऑक्सिजनच्या टंचाईने हैराण केले आहे. नगरकडे येणारा ऑक्सिजनचा टँकर पुण्यात अडवून ठेवण्याचा गंभीर प्रकार मंगळवारी रात्री घडला.

त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांना सूचना देऊन टँकर नगरकडे रवाना केल्याचा दावा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला तर आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गंभीर परिस्थिती घातल्यामुळेच टँकर नगरला मिळाल्याचे आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगीतले. टँकर अडविण्याचा पुणेरी डाव हाणून पाडल्यामुळेच अनेक रुग्णांच्या जीवात जीव आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com