2022 पर्यंत निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे आणण्याचा प्रयत्न - ना. थोरात

2022 पर्यंत निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे आणण्याचा प्रयत्न - ना. थोरात

संगमनेर (प्रतिनिधी) - ऊस व दुध हे शाश्‍वत उत्पादनाचे साधन आहे. आगामी काळात सर्व शेतकर्‍यांनी एकरी उत्पादन वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे जिवनमान उंचविण्यासाठी काम होत आहे. थोरात कारखान्याने या हंगामात विक्रमी ऊस गाळपाची कामगिरी केली आहे. करोना संकट असूनही 2022 च्या पावसाळ्यातील निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे आणण्यासाठी प्रयत्न करु, असे प्रतिपादन महसूलमंत्री थोरात यांनी केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2020-21 गळीत हंगामाच्या सांगता समारंभ ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आ. डॉ.सुधीर तांबे हे होते. तर व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील खेमनर, कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ, सौ. दुर्गाताई तांबे, जिल्हा बँकेचे व्हा. चेअरमन अ‍ॅड. माधवराव कानवडे, महानंदाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजितभाऊ थोरात, गणपतराव सांगळे, अमित पंडित, व्हा. चेअरमन संतोष हासे, शंकर पा. खेमनर, शिवाजीराव थोरात, सौ. सुनंदाताई जोर्वेकर, नवनाथ अरगडे, रामदास वाघ, आर.एम.कातोरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन करतांना ना. थोरात म्हणाले, सहकारी संस्थांमुळे ग्रामीण विकासात मजबुती आहे. ऊस व दुध हे शाश्‍वत आहे. कारखान्याने यावर्षी 192 दिवसांत विक्रमी 13 लाख 19 हजार मे.टनाचे गाळप केले आहे. कारखान्यावर सभासद, तालुक्यातील व कार्यक्षेत्राबाहेरील शेतकर्‍यांचा मोठा विश्‍वास आहे. वेळेत व योग्य भाव हे वैशिष्ट आपण कायम जपले आहे. नवीन कारखाना निर्मितीचा निर्णय हा अत्यंत लाभदायी ठरला आहे. कार्यक्षेत्रात उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी ठिबक सह आधुनिक प्रणालीचा वापर करावा लागेल. कारण कार्यक्षेत्रातील ऊस वाढी नंतर बाहेरील वाहतूकीचा खर्च कमी होवून जास्त भाव देता येवू शकतो.

कारखान्याने सातत्याने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. करोना संकटात 500 बेडचे कोविड सेंटर सुरु केले तर ऑक्सिजन प्लॅन्ट लवकर सुरु होणार आहे. सर्व सहकारी संस्था या गुणवत्तेने चालविण्यात सामान्य माणसाचे जिवनमानात आनंद निर्माण करणे हाच आपला ध्यास आहे. आपल्या जिवनातील अत्यंत महत्वाचे निळवंडे कालव्यांच्या कामासाठी मोठा निधी मिळविला आहे. मागील दीड वर्षात 2 लॉकडाऊन मुळे मजुर स्थलांतरित झाले आहे. या कामात अडथळे येत आहे. तरी ही 2022 च्या पावसाळ्याातील पाणी शेतकर्‍यांना देण्याचा आपला प्रयत्न आहे.

आ. डॉ. तांबे म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेरच्या सहकाराचा पाया घातला. शेतकर्‍यांच्या जिवनात समृध्दी आणण्यासाठी मंत्री थोरात सातत्याने प्रयत्न करत आहे.

बाबा ओहोळ म्हणाले, नामदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने उच्चांकी गाळप केले असून हे सामूहिक यश आहे. तसेच करोना काळात कोविड सेंटर सुरु केले असून सॅनेटायझरच्या किंमती ही कमी केल्या आहे. तसेच ऑक्सिजन प्लॅन्ट तातडीने कार्यान्वित होणार आहे.

कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले, या हंगामात विक्रमी गाळप करतांना डिस्टलरी प्रकल्पातून एका दिवसांत 64 हजार लिटर विक्रमी उत्पादन तर कारखान्याने एका दिवसांत 9 हजार टनाचे गाळप केले आहे. विज उत्पादनातून 53 कोटी 52 लाख उत्पादन मिळाले असत्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी संचालक चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मिनानाथ वर्पे, इंद्रजित खेमनर, संपतराव गोडगे, डॉ. तुषार दिघे, भाऊसाहेब शिंदे, अभिजीत ढोले, दादासाहेब कुटे, अनिल काळे, विनोद हासे, माणिक यादव, आर. बी. रहाणे, आर. बी. सोनवणे, संपतराव डोंगरे, विष्णू राहटळ, शांताराम कढणे, दत्तू खुळे, साहेबराव कवडे, बाळासाहेब गायकवाड, किशोर टोकसे, किरण कानवडे, केशव दिघे, शंकर ढमक, नवनाथ गडाख आदिंसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले, सूत्रसंचलन नामदेव कहांडळ यांनी तर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com