चोरट्यांकडून जिल्ह्यातील ‘एटीएम’ लक्ष्य

नगरमध्ये फोडण्याचा प्रयत्न फसला || चोरट्यांचे वाहन पोलिसांच्या ताब्यात
चोरट्यांकडून जिल्ह्यातील ‘एटीएम’ लक्ष्य

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

चार ते पाच चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न (Attempt to Break ATM) केला. पोलिसांच्या गस्ती पथकाने (Police Patrol Squad) त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडला. यामुळे लाखो रूपयांची रक्कम चोरट्यांच्या (Thieves) ताब्यातून वाचली. नागापूर (Nagapur) एमआयडीसीतील (MIDC) गरवारे चौकात स्टेट बँकेच्या एटीएमवर सोमवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान जिल्ह्यात एटीएम फोडणार्‍या टोळ्या सक्रीय झाल्या असल्याने पोलिसांसमोर (Police) आव्हान उभे राहिले आहे.

एमआयडीसीत (MIDC) स्टेट बँकेचे एटीएम (State Bank ATM) आहे. सोमवारी पहाटे पिकअप वाहनातून आलेल्या चार ते पाच चोरट्यांनी सदरचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न (Attempt to Break ATM) केला. स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे गस्ती पथक (Police Patrol Squad) तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचे वाहन येताच चोरटे त्यांच्याकडील पिकअप वाहन सोडून पळाले. पोलिसांनी सदरचे वाहन ताब्यात घेतले आहे. वाहन ताब्यात आल्याने चोरट्यांचा शोध लावण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले. दरम्यान घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके (LCB PI Anil Katake) एमआयडीसीचे निरीक्षक युवराज आठरे (MIDC PI Yuvraj Athare) यांनी भेट दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलिसांनी या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

वारंवार घडतात घटना

दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे ओवरसीज बँकेचे एटीएम फोडून 16 लाख 50 हजार रूपयांची रक्कम चोरून नेली होती. मागील महिन्यात लोणी खुर्द येथील एटीएम मशीन फोडण्यासाठी चक्क जिलेटीनच्या कांड्यांचा वापर केला गेला होता. एटीएम फोडण्याचा घटना जिल्ह्यात वारंवार होत असल्याने एटीएम सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांना या टोळ्या शोधण्याचे आव्हान आहे.

पोलिसांसमोर आव्हान

एटीएम फोडणार्‍या टोळ्या जिल्ह्यात सक्रीय आहे. या टोळ्यांनी विविध बँकांचे एटीएम मशीन फोडून त्यातील रक्कम चोरण्यांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. चोरट्यांकडून एटीएममधील सीसीटीव्ही फोडले जातात, मशीन फोडण्यासाठी गस कटर, जिलेटीनच्या कांड्यांचा वापर केला जातो. अशा सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या शोधण्याचे आव्हान स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांवर आहे.

Related Stories

No stories found.