खळबळजनक! श्रीरामपूरात पुन्हा पोलिसावर प्राणघातक हल्ला

खळबळजनक! श्रीरामपूरात पुन्हा पोलिसावर प्राणघातक हल्ला

श्रीरामपूर | प्रतिनिधी

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक किरण पवार तडीपारची नोटीस बजावण्यासाठी गेले असता यांच्यावर काल सकाळी अशोकनगर या ठिकाणी गुन्हेगाराने प्राणघातक हल्ला केला. त्यात पोलीस नाईक पवार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील आरोपी सोमनाथ कुदळे ,राहणार -राऊत वस्ती, अशोकनगर याला हद्दपारची नोटीस बजावण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक किरण पवार हे गेले असता त्या गुन्हेगाराने तडीपारची नोटीस स्विकारण्यास नकार दिला आणि त्यानंतर पोलीस नाईक किरण पवार यांच्या मोटरसायकलचे नुकसान करून, शिवीगाळ करून त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

या हल्ल्यात पोलीस नाईक किरण पवार जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वी श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांच्यावर काही जणांनी हल्ला केला होता. त्यानंतर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक यांच्यावर हल्ला झाला होता. श्रीरामपूर शहर व तालुक्यात पोलिसांवर हल्ला सत्र सुरूच आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com