पहाटे व्यायामासाठी गेलेल्या महिलेवर हल्ला

पहाटे व्यायामासाठी गेलेल्या महिलेवर हल्ला

भाळवणी |वार्ताहर| Bhalavani

पारनेर तालुक्यातील (Parner Taluka) भाळवणी-जामगाव रोड (Bhalavani-Jamgav Road) परिसरात पहाटे फिरायला गेलेल्या शैला दत्तू भोसले या महिलेवर अज्ञात व्यक्तीने हल्ला (Women Attack) करून जखमी (Injured) केल्याची घटना घडली आहे. डोक्यावर टणक हत्याराने वार करत जखमी (Injured) केले असून पहाटे फिरायला जाणार्‍या ग्रामस्थांमध्ये भितीचे (fear) वातावरण निर्माण झाले आहे.

दररोज पहाटे गावातील पुरुष, महिला, तरुण गावालगतच्या जामगाव रोड, टाकळी ढोकेश्वर रोड, नगर रोड (Nagar Road) आदह परिसरात फिरण्यासाठी (मॉर्निंग वॉक) जात असतात. रोजच्या प्रमाणे भोसले या पहाटे जामगाव रोडच्या (Jamgav Road) परिसरात फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन अचानक अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला (attack) करून जखमी केले. त्यामुळे फिरायला जाणार्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.