नेवासा : गिडेगाव येथे अल्पवयीन मुलीवर शस्त्राने वार

सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू
नेवासा : गिडेगाव येथे अल्पवयीन मुलीवर शस्त्राने वार

सार्वमत

सलाबतपूर ( वार्ताहर ) - नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथे अल्पवयीन मुलीवर ती घरात एकटी असताना धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. जखमी मुलीवर नगर येथील सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे .

अज्ञात हल्लेखोर घरात प्रवेश करून मुलीवर धारदार शस्त्राने वार करून पसार झाला. यावेळी मुलीने आरडाओरड केल्याने बाजुच्या शेतात असलेल्या नातेवाईकाने आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता घडलेला प्रकार लक्षात आला . शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलिस निरिक्षक रणजीत डेरे यांनी घटना स्थळाला भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com