एका गटाच्या तरूणीवर अत्याचार, दुसर्‍या गटाच्या युवतीचा विनयभंग

नगर तालुक्यातील घटना; परस्पर विरोधी फिर्यादी, चौघे अटकेत
एका गटाच्या तरूणीवर अत्याचार, दुसर्‍या गटाच्या युवतीचा विनयभंग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एकाने तरुणीवर अत्याचार केला तर दुसर्‍याने तलवारीने मारहाण केली. या प्रकरणी पीडित तरुणीने नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघा सख्ख्या भावांवर अत्याचार, मारहाण, आर्म अ‍ॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झालेल्या एका आरोपीच्या पत्नीनेही नगर तालुका पेालिसांत फिर्याद दिली आहे. यावरून दुसर्‍या गटाच्या दोघा सख्ख्या भावांवर विनयभंग, मारहाण आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

नगर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली असून पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यातील चारही आरोपींना तात्काळ अटक केली आहे. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करीत आहेत. 15 मार्च, 2022 रोजी आरोपीने अत्याचार केला. सोमवार, 9 मे, 2022 रोजी दुपारी आरोपींनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच तलवारीने मारहाण करून जखमी केले. दोन्ही आरोपींनी तरुणीसह तिच्या सासूला दगडे फेकून मारली, घरावर दगडफेक केली असल्याची फिर्याद पीडित तरुणीने दिली आहे.

युवती घरामध्ये असताना आरोपी तेथे आला व म्हणाला,‘तुझा पती व दीर माझ्या पत्नी व वहिणीला फोन का करतो’, तेव्हा युवती त्याला म्हणाली,‘तुझ्याकडे काही रेकॉर्डिंग आहे का?’, असे म्हणताच आरोपीने युवतीशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. आरोपी युवतीला म्हणाला,‘तुझ्या पतीला व दीराला गोळ्या घालून ठार मारील, तुमचा वंश बुडून टाकीन’, अशी धमकी दिली. आरोपींनी युवतीच्या पती व दीराला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घराच्या बाहेर जाताना दगडफेक केली असल्याचे पीडित युवतीने फिर्यादीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.