दारू पाजून तरुणीवर अत्याचार

कोतवाली पोलिसांत दोघा भावांविरूध्द गुन्हा
दारू पाजून तरुणीवर अत्याचार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तरुणीला दारू पाजून बेशुध्द केले व तिच्यावर अत्याचार केल्याची घटना अहमदनगर शहरात घडली. या प्रकरणी दोघा भावांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार तुकाराम चव्हाण, रोनक तुकाराम चव्हाण (दोघे रा. नक्षत्र लॉनजवळ, बुरूडगाव रोड, अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली.

सोमवारी सकाळी फिर्यादी तरुणी घरी एकटीच असताना तुषार व रोनक हे दोघे तिच्या घरात आले व म्हणाले, ‘ आम्हाला जेवण करायचे आहे. तेव्हा तरुणी त्यांना म्हणाली, ‘ तुम्ही आधी घराबाहेर जा, माझ्या घरात तुम्हाला जेवण मिळणार नाही’. तेव्हा तुषारने तरुणीला धरले व रोनकने खिशातून दारूची बाटली काढून तरुणीला दारू पाजली. दारू पाजल्यामुळे तरुणी बेशुध्द झाली यानंतर तुषार व रोनकने आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com