
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
सासरी भांडण झाल्याने माहेरी आलेल्या विवाहितेवर तिच्या जवळच्या नातेवाईकानेच तिचे हातपाय बांधून शेतामध्ये तिच्यावर अत्याचार केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कनोली परिसरात घडली आहे. याबाबत तालुका पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील कनोली परिसरातील एका 22 वर्षीय विवाहितेचे सासरी भांडण झाल्याने ती आपल्या माहेरी कनोली परिसरात आली होती.
शुक्रवारी सायंकाळी तिच्या जवळच्या नातेवाईकाने सासरच्या लोकांशी भांडणे कशावरून झाली अशी विचारपूस करण्याचा बहाणा करून या विवाहितेला त्याच्या शेतात नेले. त्याने या विवाहितेचे कपडे काढून तिचे हातपाय बांधून शुटींग काढून ती व्हायरल करील अशी धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. याबाबत सदर विवाहितेने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी विलास गुलाब जगताप (रा. बेलापूर ता. श्रीरामपूर) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 376(2), (एफ), 384, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड करत आहेत.