अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम ओपरेटरला मारहाण करुन 4 लाखांची लुट

अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम ओपरेटरला मारहाण करुन 4 लाखांची लुट

लोणी |वार्ताहर| Loni

लॉकडाऊनमुळे अनेक तरुण बेरोजगार झाल्याने अनेकांच्या हाताला काम राहिलेले नाही. त्यामुळेच अलीकडच्या काळात चोर्‍या तसेच लुटीमारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. काल लोणी-निर्मळ पिंपरी रस्त्यावर दिवसाढवळ्या एटीएम ऑपरेटरला दांड्याने मारहाण करून चार लाखांची रोकड पळविण्यात आली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, दिनेश वसंत गाढवे (वय 30) रा. रांजणगाव खुर्द, तालुका-राहाता हा एटीएम ऑपरेटर त्यांच्या ताब्यातील अ‍ॅक्सिस बँकेचे चार लाख रुपयांची कॅश एटीएममध्ये लोड करण्यासाठी त्यांच्या मोटरसायकलवरून जात असताना त्यांच्या मोटरसायकलीच्या पाठीमागून पांढर्‍या रंगाच्या स्विफ्ट गाडीमधून तीन अनोळखी चोरट्यांनी येऊन त्यांची गाडी अडवून त्यांच्याशी झटापट केली.

तसेच लाकडी दांड्याने गाढवेंच्या डोक्यावरील हेल्मेटवर मारून लाकडी दांड्याचा धाक दाखवून त्यांच्या ताब्यातील चार लाख रुपयांची बॅग जबरदस्तीने ओढून चोरी करुन नेली. बॅगमध्ये चार लाख रुपये रोख रकमेसह एटीएमच्या चाव्या, बँकेचे कागदपत्र व फिर्यादीचे आधारकार्ड असा ऐवज होता. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, डीवायएसपी मदने, पोलीस निरीक्षक भोये यांनी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी पोलिस स्टेशनचे पोसई सूर्यवंशी हे करीत आहेत. पिंपरी निर्मळ शिवारात दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com