एटीएमचा गैरवापर करून खात्यातून काढले 33 हजार

एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल
एटीएमचा गैरवापर करून खात्यातून काढले 33 हजार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सेवानिवृत्त कर्मचार्‍याच्या इंडीयन बँकेच्या एटीएम आईडी नंबरचा वापर करून अज्ञात व्यक्तीने खात्यातून तीन टप्प्यांत 33 हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रावसाहेब सखाराम जाधव (वय 67 रा. खातगाव टाकळी ता. नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

16 जानेवारी, 2021, 1 मार्च, 2022 व 19 मे, 2022 या दिवशी ही घटना घडली असून 7 नोव्हेंबर, 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे सेवानिवृत्त असून ते सध्या शेती करतात. त्यांचे इंडीयन बँकेत खाते आहे. या खात्याचे एटीएम कार्ड देखील आहे. अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या एटीएम कार्डच्या आईडीचा वापर करून 16 जानेवारी, 2021 रोजी 25 हजार, 1 मार्च, 2022 रोजी दोन हजार व 19 मे, 2022 रोजी सहा हजार असे 33 हजार रुपये काढून घेतले. आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर यासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार समीर सय्यद करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com