
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
गॅस कटरच्या (Gas Cutter) सहाय्याने एटीएम मशिन (ATM Machine) कट करून त्यातील पैसे पळविणारी कोपरगाव (Kopargav), संगमनेरची टोळी जेरबंद (Sangamner Gang Arrested) करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांना यश आले. अजित अरूण ठोसर (वय 22 मुळ रा. मातकुळी, ता. आष्टी, जि. बीड, हल्ली रा. साईनगर, संगमनेर), जमीर जाफर पठाण (वय 21 रा. खांडगाव, ता. संगमनेर), रवींद्र वाल्मिक चव्हाण (वय 32) व शुभम पोपटराव मंजुळे (वय 25 दोघे रा. खडकी, ता. कोपरगाव) अशी अटक (Arrested) केलेल्या टोळीतील चौघांची नावे आहेत.
त्यांनी भिंगारमधील दोन, राहुरीतील एक तसेच वैजापुर, सातारा (जि. छत्रपती संभाजीनगर) व अंभोरा (जि. बीड) येथील प्रत्येकी एका ठिकाणी एटीएम फोडले असल्याची कबूली दिली आहे. या टोळीकडून सहा गुन्हे उघडकीस आले आहे. वाकोडी फाटा (ता. नगर) येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न (ATM Machines Breaking Try) 9 जुलै रोजी झाला होता. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला होता. सदर गुन्ह्यासह जिल्ह्यात वारंवार होत असलेल्या एटीएम फोडीच्या घटना लक्ष्यात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola) यांनी गॅस कटरने एटीएम फोडणार्या टोळीचा शोध घेण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिल्या होत्या.
त्यासाठी निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार बाळासाहेब मुळीक, अतुल लोटके, संदीप पवार, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, संतोष लोढे, संदीप दरदंले, भिमराज खर्से, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, अमृत आढाव, बाळु गुंजाळ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, भाऊसाहेब काळे, बबन मखरे, ज्ञानेश्वर शिंदे, संभाजी कोतकर व अरूण मोरे यांचे पथक काम करत होते. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी बॅक ऑफ महाराष्ट्रच्या वाकोडी फाटा येथील एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशिन कट करून चोरी करणारे रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचा राहुरी परिसरात शोध घेताना पथकास एक सिल्व्हर रंगाची स्विफ्ट कार भरधाव वेगाने जाताना दिसली.
पथकाने लागलीच संशयीत भरधाव कारची माहिती निरीक्षक आहेर यांना कळविले. निरीक्षक आहेर यांनी पथकास सदर कारचा पाठलाग करण्यास सांगितले व दुसरे पथकास नगर- मनमाड रस्त्याने जावुन कारचा शोध घेणे बाबत कळविले. पथक एमआयडीसी, विळद परिसरात संशयीत वाहनाचा शोध घेताना सदर वाहन बायपास रस्त्याने जाताना दिसले. पथकाने खातगाव टाकळी (ता. नगर) शिवारात ताब्यातील वाहन स्विफ्ट कारला आडवे लावुन थांबवले व कार मधील दोन संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांची नावे अजित अरूण ठोसर व जमीर जाफर पठाण असे सांगितले. पंचासमक्ष त्यांच्या कारची झडती घेतली असता कारमध्ये ऑक्सिजन सिलेंडर, गॅस टाकी, पेंट स्प्रे, गॉगल, स्टील रॉड, निळे व लाल रंगाचा पाईप, रेग्युलेटर, नोझल, पक्कड व मोबाईल मिळुन आले. त्यांनी गुन्ह्याची कबूली देत साथीदारांची नावेही सांगितली. साथीदार रवींद्र चव्हाण व शुभम मंजुळे यांनाही ताब्यात घेत अटक केली आहे.
अजित ऊर्फ कमळ्या अरूण ठोसर हा सराईत गुन्हेगार असुन त्यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात (Sangamner City Police Station) दरोडा (Robbery), दरोडा तयारी, जबरी चोरी व चोरी (Theft) असे गंभीर स्वरूपाचे 11 गुन्हे दाखल आहेत. तसेच रवींद्र वाल्मीक चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरोधात नगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे दरोडा, जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरूपाचे 16 गुन्हे दाखल आहेत.