एटीएम कार्ड बदलून 74 हजार 995 रुपये काढले

एटीएम कार्ड बदलून 74 हजार 995 रुपये काढले

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

'राहाता तालुक्यातील शिंगवे येथील एकजणाचे एटीएम कार्डमध्ये हातचलाखीने एटीएम बदलून तब्बल 74 हजार 995 रुपयांची रोकड काढून फसवणूक केली आहे.

हा प्रकार राहाता येथील एसबीआय बँकेच्या एटीएम शाखेत घडला. शिंगवे येथील गोरख रामदास चौधरी हे राहाता येथील एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. तेथे असणार्‍या अज्ञाताने चौधरी यांच्याकडे विश्वासाने एटीएम कार्ड घेतले व हातचलाखीने ते बदलले. साकुरी येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेतून 25 हजार रुपये, अहमदनगर येथून 49995 रुपये काढून असे एकूण 74995 रुपये काढून फिर्यादी चौधरी यांची फसवणूक केली.

या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी गुन्हा रजि. नंबर 415/2022 भादंवि. कलम 406, 420 प्रमाणे अनोळखी इसमावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप तुपे हे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com