जिल्ह्यात सध्या २२६३ करोना बाधितांवर उपचार सुरू
सार्वमत

जिल्ह्यात सध्या २२६३ करोना बाधितांवर उपचार सुरू

आज रूग्ण संख्येत ३८ ने वाढ

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजलेपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३८ ने वाढ झाली आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२६३ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये ३८ रुग्ण बाधित आढळून आले. या बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये श्रीगोंदा ०१ - बेलवंडी फाटा ०२, श्रीरामपुर १७ - शहर १६, श्रीरामपुर सब जेल ०१, राहुरी ०२ - देवळाली प्रवरा ०२, मनपा ०५ - शहर ०४, केडगाव ०१, कॅन्टोन्मेंट ०५, पारनेर ०५ - डिकसळ ०१, वाडेगव्हाण ०१, देवीभोयरे ०१, पारनेर ०१, पाडळी ०१, नेवासा ०१, कोपेरगाव ०२ - खडकी ०१, शिंगणापूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com