अस्तगावला बिबट्याची दहशत

अस्तगावला बिबट्याची दहशत

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यातील अस्तगाव शिवारात गेल्या चार दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असून गावकर्‍यांमध्ये दहशत पसरली आहे.वन विभागाने पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रांमस्थाच्या वतीने करण्यात आली आहे. 10 नोव्हेंबरपासून वाडीवस्ती आस्तगाव येथे रोज बिबट्याचे दर्शन होत आहे.

दिवसभर लाईट नसल्यामुळे शेतकरी रात्री शेतावर पाणी भरण्यासाठी थांबतात तर शेतीच्या कामानिमित्ताने महिला वर्गही उशिरापर्यंत शेतावरच असतो अशातच गेल्या चार दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्यामुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले असून बिबट्यामुळे शेताला पाणी देणेसह इतरही कामे खोळंबली आहेत.तर महिला मुले यांना घराबाहेर निघणे आवघड झाले आहे. तेव्हा वनविभागाने लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थाची मागणी आहे .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com