अस्तगाव |वार्ताहर| Astgav

राहाता तालुक्यात महत्त्वाच्या समजल्या जाणार्या अस्तगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जनसेवा मंडळाचे नवनाथ विठ्ठलराव नळे

यांची तर उपसरपंचपदी सौ. गायत्री वाल्मिक जेजूरकर यांची बिनविरोध झाली आहे.

ग्रामपंचायतीच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपअभियंता सुमित घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब मगर यांच्या उपस्थितीत पार पडली. सरपंच पदासाठी जनसेवाचे नवनाथ नळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. ते बिनविरोध निवडले गेले.

तर उपसरपंचपदासाठी गायत्री जेजूरकर व युवा ग्रामविकासच्या दिपाली राहुल चोळके यांचा उमेद्वारी अर्ज दाखल झाला. अर्ज मागे घेण्याच्या कालावधीत दीपाली चोळके यांनी आपला उमेद्वारी अर्ज मागे घेतल्याने सौ. गायत्री जेजूरकर या उपसरपंच म्हणून बिनविरोध निवडल्या गेल्या.

या निवडीकडे आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खात्र डॉ. सुजय विखे पाटील यांचे बारिक लक्ष होते. सरपंचपदी निवड झालेले नवनाथ नळे जनसेवा मंडळात सक्रिय आहेत. संभाजी बिग्रेडचे काहीकाळ ते अध्यक्ष होते. तर उपसरपंचपदी निवड झालेल्या गायत्री जेजुरकर या भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजूरकर यांचे बंधु काशिनाथ जेजूरकर यांच्या सून आहेत. या ग्रामपंचायतीत तिरंगी लढत झाली असली तरी सर्व 17 सदस्य विखे पाटील यांना मानणारे आहे.

यावेळी नुून पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अशोकराव नळे, नंदकुमार गव्हाणे, वाल्मिकराव गोर्डे, निवास त्रिभुवन, गणेशचे संचालक विजय गोर्डे, जे. आर. चोळके, सोसायटीचे ज्ञानदेव चोळके, नंदकुमार जेजुरकर, आर. बी. चोळके, केशवराव चोळके, बाबुराव लोंढे, कुंडलिकराव तरकसे, संभाजी ब्रिगेडचे दशरथ गव्हाणे, अनिल नळे, दादासाहेब मेचे, संजय नळे, संतोष गोर्डे, संजय चोळके, नवनाथ मोरे, निलेश मोरे, काशिनाथ जेजुरकर, इलाहिबक्श तांबोळी, अंबादास लोंढे, रियाज शेख, बशीर शेख, भानुदास गवांदे, विलास जेजुरकर, संजय जेजूरकर, रामनाथ चोळके, ज्ञानेश्वर आरंगळे, रतनराव आरंगळे, हौशीराम जेजूरकर, सुरेश गाडेकर, रावसाहेब सापते, चांगदेव सापते, अशोक स. नळे, सागर लोंढे, भागुनाथ त्रिभान आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.