अस्तगावसह सात गावांमध्ये लॉकडाऊन

गावांमध्ये 10 पेक्षा अधिक रुग्ण; कडक निर्बंध लागू
अस्तगावसह सात गावांमध्ये लॉकडाऊन
लॉकडाऊन

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

करोनाचे दहापेक्षा अधिक रुग्ण असणार्‍या राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) अस्तगावसह (Astgav) 7 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या गावांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Collector Rajendra Bhosale) यांनी हे आदेश काढले आहेत. राहाता तालुक्यातील भगवतीपूर, पिंप्रीनिर्मळ, अस्तगाव, कोर्‍हाळे, लोणी बु., लोणी खु., कोल्हार बु. या गावांचा यात समावेश आहे. 4 आक्टोबर ते 13 ऑक्टोबर पर्यंत हे आदेश (Order) काढण्यात आले आहेत. मात्र यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. यात दवाखाने, मेडिकल, टेस्टिंग सेंटर यांचा समावेश आहे. किराणा दुकाने, वस्तु विक्री सेवा, इ. दुकाने या कालावधीत बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदरच्या क्षेत्रामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. सदर क्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान तसेच सदर क्षेत्रातून कृषीमाल व आवश्यक वस्तू वाहतूक वगळता इतर वाहनांचे आगमन प्रतिबंधीत करण्यात आले आहे.

सदर गावातील रहिवाशी यांना आवश्यक असणार्‍या बाबींचा पुरवठा होणेकामी सदर क्षेत्रातील किराणा दुकाने सकाळी 8 ते 11 यावेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या दुकानातील किराणा दुकानदार व कामगार या दोघांनीही कोविड प्रतिबंधात्मक लसीचे (Covid preventive vaccine) दोन्ही डोस घेतलेले असावेत. दूध संकलन केंद्रांनी (Milk collection center) दूध संकलन शेतकर्‍यांच्या निवासस्थानी जाऊन अथवा दूधाळ जनावरे असलेल्या ठिकाणावरून करावे. हे शक्य नसल्यास संकलन केंद्राच्या ठिकाणी कोविड सुसंगत वर्तनाचे पालन करून दूध संकलन करावे. या सातही गावांतील शाळा, धार्मिक स्थळे बंद राहाणार आहेत. लग्न समारंभास मनाई करण्यात आली आहे. तहसिलदारांना पूर्वकल्पना देऊन अत्यंविधीस अथवा दशक्रियेस 20 व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी असेल.

या सातही गावात लॉकडाऊन राहणार आहे. तसे जिल्हाधिकारी यांचे आदेश आहे. नागरिकांना वारंवार सुचना देवुनही फरक पडत नाही. करोना रुग्णांची संख्या वाढती आहे. त्यामुळे नाईलाजास्तव सुरुवातीला हे पाउल उचलले. यानंतर ही परिस्थिती सुधारली नाही तर संपुर्ण लॉकडाऊन करण्याची वेळ येवु देवु नका, विनाकारण फिरणारांवर कडक कारवाई करण्यात येईल. लसीकरण चालू राहील.

- कुंदन हिरे, तहसिलदार राहाता

Related Stories

No stories found.