अस्तगावला पोलिसांनी बालविवाह रोखला

अस्तगावला पोलिसांनी बालविवाह रोखला
file photo

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

पोलिसांच्या सतर्कतेमुळे अस्तगाव येथे साखरपुड्यातच होणारा विवाह रोखण्यात आला. याप्रकरणी नवरदेवासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला.

याप्रकरणी अस्तगावचे ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब तुकाराम मगर यांनी राहाता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यातील नवरी राहुरी तालुक्यातील केंदळ येथील असून ती 15 वर्ष 9 महिने वयाची आहे. तिचा साखरपुडा अस्तगाव येथील उमेश राजू माळी याच्याबरोबर होत असताना त्यांनी लग्न लावण्याचाही निर्णय घेतला. याची माहिती पोलिसांना मिळाली. नवरी अल्पवयीन असल्याचे माहित असून सुध्दा तिच्या विवाहास प्रोत्साहन देवून तिचे लग्न लावून देण्याची समारंभाची तयारीचे प्रयत्न असताना मिळून आले.

या स्वरुपाची फिर्याद ग्रामविकास अधिकारी यांनी राहाता पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार गुन्हा रजि. नंबर 239/2022 बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम 11 प्रमाणे आरोपी नवरा मुलगा उमेश राजू माळी, मुलाचे वडील राजू संपत माळी, मुलाची आई सुरेखा राजू माळी रा. अस्तगाव, मुलीचे वडील व मुलीची सावत्र आई रा. केंदळ खुर्द, ता. राहुरी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून नवरी मुलीस सुधारगृहात पाठविण्यात आल्याचे समजते.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार बाबा सांगळे हे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com