अस्तगाव आजपासून पाच दिवस संपूर्ण लॉकडाऊन

सुमारे आठ हजार मेट्रीक टन कचरा कोव्हिड संबंधित
अस्तगाव आजपासून पाच दिवस संपूर्ण लॉकडाऊन

अस्तगाव (वार्ताहर) - अस्तगावला करोनाचा प्रभाव वाढू लागल्याने गाव 5 दिवस संपुर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज शनिवार दि. 17 ते बुधवार दि. 21 पर्यंत गाव लॉकडाऊन राहाणार आहे. करोना ग्रामसुरक्षा समितीने हा निर्णय घेतला आहे. 15 दिवसात दोघांचे करोनाने निधन झाले तर 15 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असल्याचे सांगण्यात आले.

हा लॉकडाउन काल शुक्रवारी रात्री 8 पासुनच सुरु झाला आहे. हा लॉकडाउन गुरुवारी सकाळी 7 पर्यंत सुरु राहिल. अत्यावश्यक सेवेतील मेडिकल, दवाखाना व वैद्यकिय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. तसेच दुग्ध उत्पादक व दूध संकलन केंद्र यांना सकाळी 7 ते 8 व संध्याकाळी 6 ते 8 यावेळेत दूध संकलन करता येईल. या कालावधीत कोणीही बाहेर फिरु नये, घराबाहेर पडू नये, विनाकारण रत्यावर व इतरत्र फिरु नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, विना मास्क आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आजुबाजुचे बहुतांशी गावे लॉकडाउन करण्यात आली होती. अस्तगाव मात्र विक एंड लॉकडाऊन आणि मंगळवार लॉकडाउन होते. परंतु रुग्णांची वाढती संख्या आणि दुकानदार पॉझिटिव्ह आल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. रविंद्र गोर्डे यांच्या सुचनेवर करोना ग्रामसुरक्षा समितीने पाच दिवस संपुर्ण गाव लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सरपंच तथा समितीचे अध्यक्ष नवनाथ नळे यांनी दिली.

यावेळी समितीचे सदस्य डॉ. रविंद्र गोर्डे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब मगर, कामगार तलाठी पदमा वाडेकर, पोलिस पाटील राजेश त्रिभुवन, चोळकेवाडीचे पोलिस पाटील प्रदिप चोळके, मोरवाडीच्या पोलिस पाटील निता मोरे, तरकसवाडीचे विलासराव तरकसे अदि उपस्थित होते.

अस्तगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात अस्तगाव, पिंप्रीनिर्मळ, राजुरी, ममदापूर, रांजणगाव खुर्द, एकरुखे, हे पाच गावे आहेत. आतापर्यंत या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 1502 रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आल्या. त्यात 104 करोना पॉझिटिव्ह रुग्ण या पाच गावातुन आढळले आहेत. तसेच 14 आरटीपिसीआर चाचण्या करण्यात आल्या. काल या पाच गावातील 46 अ‍ॅटेजन टेस्ट पैकी 6 जण पॉझिटिव्ह आल्या आहेत.

संपर्कातील व्यक्तीच्या चाचण्या

अस्तगाव येथे परवा एकाचा करोनाने मृत्यु झाला. त्या अगोदरही एक जणाचा मृत्यु झाला. ज्या भागात हे रुग्ण राहत होते तेथील संपर्कात आलेल्यांच्या अँटीजेन टेस्ट कॅम्प आज घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ. रविंद्र गोर्डे यांनी दिली. या चाचणीत कुणी करोना पॉझिटिव्ह आढळले तर त्यांनी शिर्डी येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल. या पाचही गावातील नागरिकांनी करोनाची लागण होवु नये म्हणुन सतर्कता बाळगावी, असे आवाहन डॉ. गोर्डे यांनी केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com