बाप्पा पावले ! 84 सहाय्यक फौजदारांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती

बाप्पा पावले ! 84 सहाय्यक फौजदारांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गणेश आगमनाच्या दिवशीच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस अंमलदारांना आनंदाची बातमी दिली आहे. जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या 84 सहाय्यक फौजदारांना (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती दिली आहे. यामुळे पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे. अधीक्षक पाटील यांनी बुधवारी याबाबतचे आदेश काढले आहेत.

पदोन्नती मिळाल्यामध्ये संपत कोळपे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा, प्रतिनियुक्ती), माणिक शिरसाठ (मोटार परिवहन विभाग), बाळू घोडे (संगमनेर), संजय पवार, दिलीप ठुबे, बाजीराव गवारी (पोलीस मुख्यालय), बाळकृष्ण मरकड (कोतवाली), संजय धिवर (मसुप तिसगाव), सुनील पाटील (मोटार परिवहन विभाग), यशवंत गायकवाड (मसुप बाभळेश्वर), बाळासाहेब यादव (कर्जत), बाजीराव फसले (मोटार परिवहन विभाग), शेख अल्ताफ मोहिद्दीन (नागरी हक्क संरक्षण), जगन्नाथ बटुळे (नियंत्रण कक्ष), जीवन रोकडे (पोलीस मुख्यालय), अशोक रोकडे (पारनेर), शिवाजी फटांगरे, विजय परदेशी (संगमनेर शहर), सुभाष गवते (मसुप बाभळेश्वर), दत्तात्रय हुलगुंडे (पोलीस मुख्यालय), राजेंद्र गायकवाड, अरविंद महाजन (एमआयडीसी), सुनील सुर्यवंशी (दहशतवाद विरोधी पथक), आयुब मेहबुब शेख, नामदेव भोर, दीपक पंडागळे (नियंत्रण कक्ष), संजय सोनवणे, अशोक शिरसाठ, राजेंद्र पाटोळे (नगर शहर वाहतुक शाखा), राजेंद्र दरंदले (शिर्डी शहर वाहतुक शाखा), शेख सादीक गंजुभाई (साई मंदिर सुरक्षा), शिवाजी पवार (आश्वी), राजु धिवर, कमलाकांत पारधे (पोलीस मुख्यालय), सुनील सरोदे (संगमनेर शहर), विलास भांगे (श्रीरामपूर शहर), शेख रौफ समद (पोलीस अधीक्षक वाचक शाखा), शेख असिफ युसुफ (पोलीस मुख्यालय), सुदाम फटांगरे (लोणी), शेख जैनुद्दीन फजलोद्दीन (पोलीस मुख्यालय), रंगनाथ राठोड (तोफखाना), रामनाथ मोरे (शिर्डी), पोपट टिक्कल, महादेव शिंदे (राहुरी), अनिल औटी (नियंत्रण कक्ष), शिवाजी ढवळे (जिल्हा विशेष शाखा), बाळासाहेब गायकवाड (एसडीपीओ, कर्जत), राजेश गायकवाड (संगमनेर तालुका), राजेंद्र गायकवाड (नियंत्रण कक्ष), संजय कानगुडे (सुपा), राजेंद्रकुमार कांबळे (एमआयडीसी), काशिनाथ मरकड (राहुरी), शेख ईस्माइल अहमद (संगमनेर तालुका), जितेंद्र ढवळे (साई मंदिर सुरक्षा), भाऊसाहेब वाघमारे (नगर शहर वाहतुक शाखा), ज्ञानदेव पवार (पोलीस मुख्यालय), बाळासाहेब पारधी (एसडीपीओ, संगमनेर), विठ्ठल घोडे (लोणी), शेषराव वाघमारे (मसुप, केडगाव), अरविंद गुंजाळ (पोलीस मुख्यालय), अनिल मोरे (संगमनेर तालुका), राजेंद्र मुळे (भिंगार कॅम्प), संजय खंडागळे (नियंत्रण कक्ष), भास्कर गावंडे (नेवासा), अनिल आढाव (तोफखाना), मोहन मुनफन (पोलीस मुख्यालय), जोसेफ बोरडे (बेलवंडी), नागेश्वर पाठक, शेख इसार ईस्माइल, जालिंदर जासूद (पोलीस मुख्यालय), महेश कुसारे (कोपरगाव), शेख हसन कासम (आर्थिक गुन्हे शाखा), बाळासाहेब यादव (जिल्हा विशेष शाखा), बाळू दिवटे, सुरेश शिंदे (नियंत्रण कक्ष), पठाण अख्तरअली शेरअली (सुपा), रावसाहेब शिंदे (श्रीरामपूर तालुका), कैलास कुर्‍हाडे (संगमनेर तालुका), विजय शिर्के, ज्ञानदेव पंधरकर (मोटार परिवहन विभाग), अशोक भोसले (नियंत्रण कक्ष), मोहन गाजरे (स्थानिक गुन्हे शाखा), अंबादास हुलगे (मोटार परिवहन विभाग), शैलेंद्र ससाणे (नेवासा) यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com