
अहमदनगर (प्रतिनिधी)
बालिकाश्रम रोडवरील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय अज्ञात चोरट्यांनी फोडले. मंगळवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली.
कार्यालयातून चोरीला काही गेले नसले तरी कार्यालय कोणी व कशासाठी फोडले याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कृष्णा कवले (रा. केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
सोमवारी दिवसभर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे कामकाज सुरू होते. सायंकाळी 6:20 वाजता कार्यालय बंद करण्यात आले होते. दुसर्या दिवशी मंगळवारी सहाय्यक कामगार आयुक्त कवले चोंडी (ता. जामखेड) दौर्यावर होते. सकाळी शिपाई वैजयंता होळकर याने कार्यालय फोडले असल्याची माहिती कवले यांना फोनवरून दिली.
कवले यांच्या आदेशाने कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांनी पाहणी केली असता कार्यालयातील कपाटे उघडी दिसली. कवले यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला असून तो कोणी व कशासाठी केला, याचा शोध तोफखाना पोलीस घेत आहेत.