सहाय्यक वनसंरक्षकास चाळीस हजारांची लाच घेताना पकडले

लाचलुचपत खात्याची आळेफाटा येथे कारवाई
सहाय्यक वनसंरक्षकास चाळीस हजारांची लाच घेताना पकडले

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

शेतजमीन (agricultural land) निर्वणीकरण करण्यासाठी चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील वनखात्याचे सहाय्यक वनसंरक्षक विशाल किसन बोराडे (Assistant Conservator of Forests Vishal Kisan Borade)यास पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथे अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Bribery Prevention Department) पथकाने रंगेहाथ पकडले.

आळेफाटा (alephata) येथील एका तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत खात्याच्या पथकाने सापळा लावून आळेफाटा येथे काल सायंकाळी ही कारवाई (Action) केली. तक्रारदाराचा मावसभाऊ संगमनेर (Sangmner) तालुक्यातील डोळासणे (Dolasane) येथे राहत असून त्याची वनक्षेत्रात येत असलेली शेतजमीन ही निर्वणीकरण करावयाची होती. जमीन निर्वणीकरण झाल्याबाबतचा अभिप्राय देऊन जिल्हाधिकार्‍यांना अहवाल पाठवण्यासाठी बोराडे यांनी 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी (Demand for bribe) संगमनेर येथे केली.

ही रक्कम आळेफाटा (alephata) येथे देण्याचे ठरले. यानुसार काल सायंकाळी सात वाजता बोराडे हे 40 हजार रुपयांची रक्कम स्वीकारत (accepted) असताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने छापा (raid) टाकला. बोराडे यांना 40 हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपअधीक्षक हरिश खेडकर (Harish Khedkar) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक शाम पवरे, पोलीस नाईक विजय गंगूल, पोलीस अंमलदार रवींद्र निमसे, चालक पोलीस हवालदार हरूण शेख यांचा समावेश होता.

सहाय्यक वन संरक्षक बोराडे हे एक महिन्यापूर्वीच संगमनेर (sangmner) येथील वन कार्यालयात रुजू झाले होते. महिन्याभरातच कारवाईला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहेे.

उपअधिक्षकांचा पोलिसांना जाब

सायंकाळी आळेफाटा येथे ही कारवाई करण्यात आल्यानंतर लाचलुचपत खात्याचे अधिकारी व पथक संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आले होते. या खात्याचे उपाधीक्षक हरिश खेडकर हे विश्रामगृहात बसलेले होते. लाच स्वीकारणार्‍या वनधिकार्‍यांची जबाबदारी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचार्‍यांवर देण्यात आली. हे दोन कर्मचारी शासकीय विश्रामगृहात आले.त्यातील एकाने डोक्यात टोपी घातलेली नव्हती. यावेळी उपाधीक्षक खेडकर यांनी या कर्मचार्‍याला तुझी टोपी कुठे आहे असा जाब विचारला असता आपण घाईने आल्यामुळे विसरलो असे त्यांनी सांगितले. दुसर्‍या कर्मचार्‍यांनी घातलेली टोपी त्याची नव्हती यामुळे उप अधीक्षकांनी दोघांनाही झापले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com