सहायक वनसंरक्षक, वन परिक्षेत्राधिकारी लाचेत पकडले

लाकूड वाहतुकीला परवानगी देण्यासाठी घेतले ३० हजार
सहायक वनसंरक्षक, वन परिक्षेत्राधिकारी लाचेत पकडले

अहमदनगर|Ahmedagar

लाकूड वाहतुकीला परवानगी देण्यासाठी ३० हजाराची लाच घेताना वन विभागाच्या अहमदनगर कार्यालयातील सहायक वनसंरक्षक सुनील रतन पाटील (वय ५७) आणि वन परिक्षेत्राधिकारी सुनील अच्युतराव थेटे (वय ५६) या दाेघांना पकडले आहे. लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने अहमदनगरमध्ये गुरूवारी रात्री ही कारवाई केली.

यातील तक्रारदार यांचे लाकूड वाहून नेणारे वाहन कारवाई करत वन विभागाने पकडले हाेते. ते कारवाई न करता सोडून दिले. यासाठी तक्रारदाराकडून या दाेघांनी ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यातील पहिल्या टप्प्यात ३० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून ३० हजार रूपये लाचेची रक्कम स्वीकारताना पाटील व थेटे यांना नाशिक पथकाने गुरुवारी पकडले. लाचलुचपत नाशिक परिक्षेत्राचे पाेलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पथकाचे पाेलीस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, पोलीस नाईक प्रकाश महाजन, बाविस्कर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com