डांबरात फसलेला मेंढपाळ बचावला, चार शेळ्यांचा मृत्यू

डांबरात फसलेला मेंढपाळ बचावला, चार शेळ्यांचा मृत्यू

करंजी |प्रतिनिधी| Karanji

कंपनीजवळ खड्ड्यात साचलेल्या डांबरात अडकलेल्या शेळ्या काढण्यासाठी खड्ड्यात उतरलेल्या मेंढपाळाच अडकुन बसला मात्र आरडाओरड केल्याने ते थोडक्यात बचावल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील सोमठाणे रोडवर घडली. मच्छिंद्र भोसले (रा. तिसगाव, ता. पाथर्डी) असे वाचलेल्या मेंढपाळाचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सोमठाणार रोडवर असलेल्या एका डांबराच्या प्लांटजवळ एका खड्ड्यात डांबर साचलेले होते.

त्या ठिकाणी भोसले हे शेळ्या चारत असताना त्यांच्या चार शेळ्या खड्ड्यात साचलेल्या डांबरामध्ये अडकल्या. त्या शेळ्या डांबराच्या खड्ड्यातून बाहेर काढत असताना शेळ्या चालणारे मच्छिंद्र भोसले हे देखील या डांबरात फसले मात्र त्यांनी वेळीच आरडा ओरड केल्यामुळे आजूबाजूचे शेतकरी घटनास्थळी धावून आले व त्यांनी भोसले यांना या खड्ड्यातून सुखरूप बाहेर काढले. मात्र त्यांच्या चार शेळ्यांचा डांबरात फसल्याने गुदमरून मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला असे धोकादायपणे डांबर सोडणार्‍या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com