आश्वीत दोन गटात हाणामार्‍या

परस्परविरोधी फिर्यादी दाखल
आश्वीत दोन गटात हाणामार्‍या

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथील दोन गटामध्ये किरकोळ कारणामुळे मारामारी झाली. दोन्ही गटाने एकमेकां विरोधात आश्वी बुद्रूक पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात कलम 144 लागु आहे असे असताना आश्वी बु येथे मध्ये दोन गटा मधील झालेल्या मारामारीमुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, राहुल शहादेव घुटे (वय 22 वर्ष, रा. आश्वी बु) यास काही कारण नसताना शुभम संजय गाडेकर, अजय गंगाधर शेंडे रा आश्वी बु ता. संगमनेर यांनी दि 29 एप्रिल रोजी दुपारी 4 वा. महादेव मंदीरा जवळ, आश्वी बु, ता. संगमनेर दोरीच्या साह्याने बांधुन मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली तसेच अजय शेंडे याने फिर्यादीचा मुलगा राहुल यांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला चावा घेवून त्यास जखमी केले.

नंदा शहादेव घुटे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा रजिस्टर नंबर 56/2021 भारतीय दंड संहिता कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तर परस्पर विरोधी फिर्यादीत शुभम सजंय गाडेकर, वय 25 वर्ष, धंदा खाजगी नोकरी याने म्हटले आहे की, विजय खेमनर (पुर्ण नाव माहित नाही) रा. ओझर, बंटी साहेबराव मदने, लखन साहेबराव मदने, राहुल शहादेव घुटे सर्व राहणार आश्वी बु तसेच इतर दोन अनोळखी इसम यांनी दि. 29 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 ते 7 वाजेच्या दरम्यान घरात घुसुन दुपारी झालेल्या भांडण्याचा राग मनात धरून विजय खेमनर याने घराजवळील पडलेली विट हातामध्ये घेऊन शुभम गाडेकर याच्या डाव्या कानाखाली मारली व यातील साक्षीदार नंदा सजंय गाडेकर भांडणे सोडवण्यासाठी गेली असताना तिला देखील आरोपींनी लाथा-बुक्यांनी मारहाण केली तसेच ढकलुन दिले.

तसेच राहुल घुटे याने फिर्यादीच्या डावे हाताच्या खांद्यावर तसेच मनगटावर लाकडी दांड्याने मारहाण केली. या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नं 57/2021 भारतीय दंड संहिता कलम 143, 147, 148, 452, 324, 323, 504, 506 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार सहा. फौजदार भाग्यवान व पवार करत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com