पोलीस ठाण्याच्या हद्दीवरून थोरात-विखे वादाची ठिणगी ?

पोलीस ठाण्याच्या हद्दीवरून थोरात-विखे वादाची ठिणगी ?

विखेंनी दिला होता आंदोलनाचा इशारा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिर्डी मतदारसंघातील (Shirdi constituency) नऊ गावे संगमनेर तालुका पोलिस ठाण्याला (Sangamner Taluka Police Station) जोडण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. या विषयावरून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (BJP leader Radhakrishna Vikhe Patil) यांच्यातील संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची प्रशासकीय प्रक्रीयेपलीकडे राजकीय चर्चा (Political discussion) सुरू झाली आहे. एकमेकांवर कुरघोडीचा हा प्रकार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, आश्वी पोलीस ठाण्याच्या (Ashwi Police Station) हद्दीतील रहिमपूर (Rahimpur) आणि 8 गाव परिसरातील नागरिकांनी शनिवारी पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांना निवेदन दिले आहे.

या पुर्नरनेला भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील (BJP leader Radhakrishna Vikhe Patil) यांनी विरोध केला होता. यासंबंधी जिल्हाधिकार्‍यांना 21 फेबु्रवारीलाच पत्र देत विरोध नोंदविला होता. हा निर्णय घेतांना लोकप्रतिनिधी या नात्याने मला विश्वासात घेणे आवश्यक होते, मात्र तसे झालेले नाही. प्रशासनाने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्या दबावाखाली निर्णय घेतल्यास मी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) समोर आंदोलन करले, अशा इशारा (Hint) त्या पत्रात ज्येष्ठ नेते आ. विखे (BJP leader Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिला होता. आता या गावांना संगमनेर तालुका पोलिस ठाण्याला (Sangamner Taluka Police Station) जोडण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे विखेंकडून (BJP leader Radhakrishna Vikhe Patil) विरोध तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यांच्या समर्थकांनी हा मुद्दा उचलून धरण्यास सुरूवात केली आहे.

शनिवारी रहिमपूर (Rahimpur) परिसारातील गावच्या नागरिकांचे शिष्टमंडळ जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील (Sp Manoj patil) यांच्या भेटीला आले होते. त्यावेळी पाटील यांना निवदेन देण्यात आले. त्यात शिर्डी मतदार संघातील (Shirdi constituency) व संगमनेर (Sangamner) तालुक्यातील आश्वी पोलीस स्टेशन (Ashwi Police Station) हद्दीतील रहिमपूरसह अन्य 8 गावे संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला (Sangamner Taluka Police Station) जोडण्यात येणार असल्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. यामुळे रहिमपूर गावातील नागरिकांमध्ये अस्वस्था आहे. रहिमपूरसह परिसारातील गावे ही संगमनेरपासून लांब असून आश्वी जवळ असल्याने या गावातील नागरिकांनी 20 ते 25 किलोमीटर अंतरावर संगमनेला का जायचे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

आश्वीसह (ashwi) पंचक्रोशीतील गावात शांतता, कायदा, सुव्यवस्था आबादीत रहावी व गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा, यासाठी आश्वीला ठिकाणी पोलीस स्टेशन मंजूर (Police station approved) झाले होते. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओझर बुद्रुक, ओझर खुर्द, रहिमपूर, कणकापूर, कोंची, मांची, कनोली, मनोली व हंगेवाडी ही गावे आहेत. आता ही गावे संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला जोडण्याची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असून या गावातील नागरिकांची बाजू ऐकून न घेता पोलीस प्रशासनाने निर्णय घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा बापुसाहेब गुळवे, रघुनाथ शिंदे, शांताराम शिंदे, सचिन शिंदे, रविंद्र गाठे यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.

दरम्यान, या विषयावर आ. विखे (BJP leader Radhakrishna Vikhe Patil) यांनी आंदोलन करण्याचा इशारा (Movement Hint) दिल्यानंतरही मंत्री थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्याकडून शिर्डी मतदारसंघातील (Shirdi constituency) 9 गावे संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला (Sangamner Taluka Police Station) जोडून शह दिल्याची चर्चा वाढल्याने या नेत्याच्या समर्थकांत राजकीय संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com