पोलिसांनी पाठलाग करुन स्पिरिटसह एकाला पकडले

पोलिसांनी पाठलाग करुन स्पिरिटसह एकाला पकडले

आश्वी (वार्ताहर)

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारात असलेल्या रस्त्यावर दारू बनवण्यासाठी उपयोगात येणारे रसायन पाठलाग करुन आश्वी पोलिसांनी एका वाहनातून जप्त केले आहे. एकास ताब्यात घेतले तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. याबाबत पोलीस नाईक विनोद गंभिरे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शनिवारी पहाटे पोलीस नाईक विनोद गंभिरे, पोलीस नाईक शांताराम झोडगे, होमगार्ड मर्गेश भुसारी व राहुल नागरे हे गस्त घालत असताना त्यांना आश्र्वी खुर्द शिवारात एका छोटा हत्ती वाहना चा (एम. एच. २३ एयु. १३८२) संशय आल्याने त्यांनी गाडीचा पाठलाग केला. पोलीस गाडी पाहन गाडीतील एक जण पळून गेला. यावेळी पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये ३० ते ३२ कॅन आढळले. त्यामुळे गाडीतील व्यक्तीला ताब्यात घेत चौकशी केली असता दारु बनवण्यासाठी उपयोगात येणारे स्पिरीट असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी हा मुद्देमाल आधी पोलीस ठाणे येथे आणून राज्य उत्पादन शुल्क संगमनेर यांना याबाबत माहिती कळवली.

माहिती मिळताच दुय्यम निरीक्षक ए. जे. यादव, व्ही. जी. सुर्यवंशी, सहाय्यक दुय्यम निरिक्षक एस. आर. वाघ, जवान व्ही. एम. पाटोळे, एस. जी. गुंजाळ, एस. डी. निमसे यांनी आची येथे येऊन पाहणी करत अल्कोहोलचा वास येत असल्याने दारु बनवण्यासाठी उपयोग होऊ शकतो असे सांगितले. यावेळी सहाय्यक फौजदार तात्याराव बाघमारे यांनी मुद्देमालाचा पंचनामा केला असून यावेळी पोलिसांनी ५१ हजार ८०० रुपये किमतीचे स्पिरीट सदृष्य रसायनाचे २८ कॅन, १ लाख रुपये किमतीचे वाहन तसेच इतर असे १ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान आश्ची पोलिस ठाणे येथे आरोपी संकेत अनिल कुन्हाडे (रा. गोंधवणी ता. श्रीरामपूर) याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १६४/२०२१ नुसार महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई), ८३, ९०, ९८ (२) प्रमाणे दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तात्याराव वाघमारे करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com