आश्वी खुर्द येथे चंदनाच्या झाडाची चोरी

आश्वी खुर्द येथे चंदनाच्या झाडाची चोरी

आश्वी |वार्ताहर| Ashwi

चंदनाच्या लाकडाला सोन्याचा भाव मिळत असल्यामुळे संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारातून चदंनाचे झाड चोरीला गेल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

चंदन तस्कर मोठ्या शिताफीने चंदनाची झाडे तोडून नेल्याच्या घटना सातत्याने घडत असल्यातरी चोरट्याचा मात्र तपास लागत नाही. त्यामुळे सामान्य नागरीकांनी घराच्या अंगणात लावलेली आणि जीवापाड जपलेली चंदनाची झाडे चोरीला जाण्याच्या घटना या नियमित घडत आहेत. वाळू तस्करी, लहान मोठ्या चोर्‍या, वाहन चोर्‍या व आता चंदन झाडांची चोरी सतत होत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडुन कठोर कारवाईची नागरीकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री आश्वी खुर्द गावठाण लगत असलेल्या शेडगाव रस्तावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेतील एक मोठे चदंनाचे झाड कापून त्यातील गाभा चोरट्यांनी काढुन नेला तर दोन झाडाच्या खोडाला होल पाडल्याचे शनिवारी सकाळी येथिल नागरीकांच्या लक्षात आल्याने ही घटना उघडकीस आली असून घटनास्थळाची परिस्थिती पहाता चोरट्याकडे झाड चोरीची अत्याधुनिक हत्यारे असण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने या चोरट्याचा बदोबस्त करण्याची मागणी नागरीकांसह परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.