आश्वी खुर्द येथे भरदिवसा झाली तरसाची शर्यत

हंगेवाडीत दोन बिबट्यांनी ओलांडला रस्ता
आश्वी खुर्द येथे भरदिवसा झाली तरसाची शर्यत

आश्वी |वार्ताहर| Ashwi

लहानपणी आपण सर्वांनी आजीकडून अथवा पाठ्यपुस्तकातून ससा व कासवाच्या शर्यतीची गोष्ट ऐकली असून आजही प्रत्येकाच्या मनात ती गोष्ट जशीचा तशीचं घर करुन आहे. याचं गोष्टीसारखाचं काहीसा थरारक अनुभव संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे घडला असून दोन तरस शर्यत लागल्याच्या अविर्भावत पळत असल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमात तुफान वायरल झाल्याचे पहावयस मिळत आहे.

आश्वी खुर्द येथील प्रगतशील शेतकरी प्रशांत कोडोंलिकर यांची दाढ खुर्द ते आश्वी खुर्द रस्त्यावर वस्ती आहे. नेहमी प्रमाणे प्रशांत कोडोंलिकर सोमवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास आपल्या वस्तीच्या गेटजवळ उभे होते. त्यावेळी दाढ कडून आश्वीच्या दिशेने सुसाट वेगाने एक तरस येताना दिसला. त्यामुळे त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये त्या तरसाचे चित्रीकरण सुरु केले असता त्या तरसापाठोपाठ दुसरा तरसही दुप्पट वेगाने त्या ठिकाणाहून गेल्याचे त्यांनी कॅमेरात कैद केले आहे.

तर मागील अनेक दिवसापासून आश्वीसह पंचक्रोशीतील प्रतापपूर या गावात ही तरसाचा वावर वाढल्याच्या अनेक घटना उजाडात आल्या आहेत. दुसर्‍या एका घटनेत हंगेवाडी शिवारातील संगमनेर-हंगेवाडी रस्त्यालगत असलेल्या अकुंश सानप यांच्या वस्तीलगत सोमवारी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास दोन पुर्ण वाढ झालेले बिबटे रस्ता ओलांडून ऊसाच्या शेतात जाताना आश्वी खुर्दचे ग्रामपंचायत कर्मचारी आदिनाथ जाधव यांनी संगमनेरहून आश्वीकडे येत असताना कॅमेरात कैद केले आहेत.

दरम्यान सध्या परिसरात ऊस तोड सुरु असल्याने बिबटे लपण क्षेत्राच्या आश्रयाला जाताना दिसत असून मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाणही वाढले आहे. बिबट्याने शिकार केल्यानंतर उरलेले मांस हे तरस खातात त्यामुळे बिबट्या पाठोपाठ तरसाचीही संख्या वाढत असून कोल्ह्याप्रमाणेचं परिसरातून कुत्रे, मुगुंस, मोर, ससे हे प्राणी नामशेष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. त्यामुळे वीजेच्या लपंडावामुळे त्रस्त असलेला शेतकरी रात्री अपरात्री पिकांना पाणी देण्यास धजावत नसून नागरीकांमध्ये दिवसेंदिवस दहशत वाढत असल्याने वनविभागाने योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत नागरीक व्यक्त करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com