आश्वी बुद्रूक सोसायटीवर विखे गटाची सत्ता

आश्वी बुद्रूक सोसायटीवर विखे गटाची सत्ता

आश्वी |वार्ताहर| Ashwi

शिर्डी मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक सेवा सहकारी सोसायटीचा 2022-27 या पंचवार्षिक निवडणूकीत भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाने 7 जागावर विजय मिळवून सत्ता आपल्याकडेच खेचून आणली आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अमरेश्वर ग्रामविकास मंडळाला 6 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे अटीतटीच्या झालेल्या लढतीत एक जागा गमवावी लागल्यामुळे अमरेश्वर ग्रामविकास मंडळाचे सत्ता स्थापनेचे स्वप्न मात्र अपुर्ण राहिले आहे.

या निवडणुकीत सर्वसाधारण प्रवर्गातून दशरथ महादू खेमनर (452), मच्छिंद्र महादू गायकवाड (414), अण्णासाहेब रंगनाथ जर्‍हाड (443), मच्छिंद्र भागाजी ताजणे (414), तुळशिराम भिकाजी निघुते (441), ब्रिजमोहन राधाकिसन बिहाणी (412), कैलास सहादू मुळे (426) हे उमेदवार विजयी झाले आहेत. तर नवनाथ किसन खेमनर यांच्यासह प्रतिस्पर्धी उमेदवाराला समान मते पडल्यामुळे चिठ्ठी टाकून त्यांना विजयी घोषीत करण्यात आले.

महिला राखीव प्रवर्गातून वैशाली विनायक जर्‍हाड (440) व पार्वताबाई बाळकृष्ण होडगर (456), अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातून नामदेव किसन शिदें (438), इतर मागास प्रवर्गातून ज्ञानेश्वर दामू ताजणे (441), भटक्या, विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गातून बाबुराव काशिनाथ जर्‍हाड (447) हे विजयी झाले आहेत.

दरम्यान आश्वी बुद्रुक सेवा सहकारी सोसायटीची संचालक पदासाठीची पंचवार्षिक निवडूक अतिशय अटीतटीची झाली. सकाळी 8 ते सायंकाळी 4 या कालावधीत सभासदानी आपला मतदानाचा हक्क बजावला. एक-एक मत बहुमोल असल्याने जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे 13 जागासाठी 91 टक्के मतदान झाले. तब्बल पाच तास चाललेल्या मतमोजणी नंतर निकाल घोषित करण्यात आला. तुरळक बाचाबाचीच्या घटना वगळता मतदान शांततेत पार पडले असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एस. वाकचौरे यांनी काम पाहिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com