आश्वी बुद्रुक येथे ज्येष्ठाचा तर पानोडीत लहान मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

आश्वी बुद्रुक येथे ज्येष्ठाचा तर पानोडीत लहान मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक व पानोडी येथे मंगळवारी दोन दुर्दैवी घटना घडल्या. आश्वी बुद्रुक येथिल रमेश राधुजी गायकवाड (वय 65) या ज्येष्ठ व्यक्तीचा विजेचा धक्क्याने मृत्यू झाला तर पानोडी येथे ओंकार गणेश पवार (वय 14) या लहान मुलाचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

पानोडी शिवारातील आश्वी - साकूर रस्त्यालगत असलेल्या पवार वस्तीलगत ओंकार हा मुलासमवेत खेळत होता. यावेळी लगत असलेल्या विजेच्या खांबाला ओंकारचा हात लागल्यामुळे त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. विशेष म्हणजे सोमवार व मंगळवार या काळात वीजपुरवठा मोठ्या काळासाठी खंडित होता. अवघ्या पंधरा मिनिटांसाठी वीजपुरवठा सुरळीत झाला असताना ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली. ओंकार हा 8 वी इयत्तेत शिक्षण घेत होता. तर दुसर्‍या एका घटनेत आश्वी बुद्रुक येथिल रमेश गायकवाड यांनाही विजेचा जोरदार धक्का बसल्याची घटना घडली. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांनाही लोणी येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र दोघांचाही उपचाराआधीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

पानोडी येथिल गणेश सोपान पवार यांचा ओंकार हा मुलगा तर सिताराम सोपान पवार यांचा पुतण्या होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिण व चुलते असा मोठा परिवार आहे. तसेच आश्वी बुद्रुक येथिल दिवगंत रमेश गायकवाड हे आश्वी येथिल सतीश व हेमंत गायकवाड यांचे वडील तर राजेंद्र माधव गायकवाड यांचे चुलते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, दोन मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे. दरम्यान मंगळवारी उशीरा दोघांवरही शोकाकूल वातावरणात आश्वी व पानोडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Stories

No stories found.