आश्वी बुद्रुक येथे दोन ते तीन ठिकाणी घरफोड्या

40 हजारांचा ऐवज लांबविला
आश्वी बुद्रुक येथे दोन ते तीन ठिकाणी घरफोड्या

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी तीन ते चार ठिकाणी घरफोड्या करत मोठा ऐवज चोरून नेल्याची जोरदार चर्चा सुरू असून याबाबत मात्र एकच गुन्हा दाखल झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. तर इतरांनी गुन्हा दाखल करण्याचे का टाळले? हे मात्र कळू शकले नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शनिवारी मध्यरात्री आश्वी पोलीस स्टेशन पासून पाचशे फुटाच्या अंतरावर भरवस्तीत चोरट्यांनी तीन ते चार ठिकाणी चोर्‍या करून मोठा ऐवज चोरून नेल्याची चर्चा आहे. मात्र आश्वी पोलीस ठाण्यात लहानबाई सटवा खेमनर यांनी एकमेव चोरीची तक्रार दाखल केली आहे. यामध्ये लहानबाई खेमनर शनिवारी नातेवाईकांकडे गेल्या होत्या. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी वीस हजार रुपये रोख व सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे 35 ते 40 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 132/2022 नुसार भारतीय दंड संहिता कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार डी. डी. बर्डे हे पुढील तपास करत आहेत.

दरम्यान खेमनर यांच्या घराशेजारी असलेल्या तीन ते चार ठिकाणी चोरट्यांनी हाथ साफ केल्याची गावात चर्चा आहे. मात्र या ठिकाणी झालेल्या चोर्‍यांची पोलीस ठाण्यात नोंद झालेली नसल्यामुळे नागरीकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. तर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर चोर्‍या झाल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com