आश्वी बुद्रुकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चार तरुण जखमी
सार्वमत

आश्वी बुद्रुकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चार तरुण जखमी

Arvind Arkhade

आश्वी|वार्ताहर|Ashwi

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील प्रवरा डाव्या कालव्याजवळ बिबट्याने धुडगुस घातला असून गुरुवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यामध्ये चौघे तरुण जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आश्वी बुद्रुक येथील प्रवरा डाव्या कालव्यावरील लेंडी नाल्यावरून गुरुवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास मादी बिबट्या भक्ष्याच्या शोधात दबा धरून बसली होती. तर पिल्ले रस्त्यावर खेळत असताना प्रवीण रामनाथ घोलप व सार्थक गणेश घोलप हे दोघे दूध घालून घरी जात होते.

यावेळी शिकारीच्या शोधात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी बिबट्याने त्यांच्या पायाला चावा घेण्याचा प्रयत्न केला मात्र मोटरसायकलला अडकवलेल्या दुधाच्या किटलीमुळे पायाला पंजाने ओरबडले.

यावेळी घोलप बंधुंनी आरडाओरड करत प्रतिकार केला असता प्राध्यापक भास्कर खेमनर, रामनाथ घोलप, संपत निर्मळ, शिवाजी खेमनर हे मदत्तीला आले असता बिबट्याने व त्याच्या पिल्लाने शेजारील शेतात धुम ठोकली. नंतर याच ठिकाणी पुन्हा कैलास कारभारी खेमनर व सोमनाथ तुळशीराम खेमनर हे ओझरला रात्री घरी जात असताना बिबट्याने दोघांवर हाल्ला करुन गंभीर जखमी केले.

बिबट्याचे आश्वी, उंबरी-बाळापूर परिसरात मणुष्यासह पशुधनावर हल्ले सुरू असल्याने पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तात्काळ पिजंरा लावून बिबट्या जेरबंद करावा, अशी अशोक घोलप, अनिल भुसाळ, बाबासाहेब गायकवाड, विनायकराव जर्‍हाड यांनी केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com