आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, वसतीगृह अधिक्षकाचे तडकाफडकी निलंबन

आल्हणवाडी विद्यार्थी बुडून मृत्यू प्रकरणी समाजल्याण सह आयुक्तांकडून कारवाई
आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, वसतीगृह अधिक्षकाचे तडकाफडकी निलंबन

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील आल्हनवाडी येथील प्राथमिक आश्रमशाळेतील सुरज पांढऱे व पायल पांढरे या बहीणभावाच्या मृत्युप्रकरणाची चौकशी करण्यासाठी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी शनिवारी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यी, शिक्षकांशी सवांद साधला. चौकशी करुन घटनेला प्रथमदर्शनी जबाबदार असणारे प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब मस्के व वसतिगृह अधीक्षक ज्ञानदेव कर्डिले यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तर संस्थेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे.

शुक्रवारी (दि.27) अल्हनवाडी आश्रमशाळेत सूरज संदीप पांढरे ( 8) व पायल संदीप पांढरे (9) यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी शनिवारी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यी, शिक्षकांशी सवांद साधला. दरम्यान चौकशीत एका विद्यार्थ्याने सुरज व पायलला शेततळ्याकडे जाताना पाहीले होते. त्याने त्यांना जाऊ नका अशी विनवणी केली होती. त्याची माहीती तेथील लोकांना दिली. तरीही ही घटना घडली आहे असे समोर आले आहे.

घटनेच्या हलगर्जीपणाबाबत प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब मस्के व वसतिगृह अधीक्षक ज्ञानदेव कर्डिले यांनी दुर्लक्ष केल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांना दोषी ठरवत सेवेतुन निलंबीत करण्यात आले आहे.

चौकशीतुन अनेक गोष्टी दुर्लक्षीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुख्याध्यापक व वस्तीगृह अधिक्षक हेच घटनेला कारणीभुत असल्याचे समितीच्या अहवालावरुन स्पष्ट होते आहे. संस्थेने शासकिय नियमांचे पालन केले नाही. म्हणुन संस्थेचा परवाना रद्द करण्याची शिफारसीचा अहवाल वरीष्ठांना सादर केला आहे.

- राधाकिसन देवढे, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com