
वडाळा महादेव |वार्ताहर| Wadala Mahadev
श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील अशोकनगर फाटा (Ashoknagar Phata) या ठिकाणी सलग दोन दिवस दोन अपघाताच्या (Accident) घटना घडल्या. रविवारी रात्री दुचाकी व कारचा अपघात (Bike And Car Accident) होऊन दुचाकीवरील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला. तर दुसरा जखमी (Injured) झाला. त्यानंतर काल सोमवार दि. 29 रोजी दुपारी झालेल्या अपघातात एक मुलगी जखमी झाली. या ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताची (Accident) मालिका सुरुच आहे.
रविवार दि. 28 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अशोकनगर फाटा (Ashoknagar Phata) येथे बांधकाम कामगार दुचाकीवरुन श्रीरामपूरच्या (Shrirampur) दिशेने घरी जात असताना श्रीरामपूरकडून येणार्या चारचाकी वाहनाने दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. रस्त्यावर झालेल्या जोरात आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. यावेळी श्रीरामपूर (Shrirampur) येथील बांधकाम कामगार तसेच सोबत असलेला एक व्यक्ती जखमी झाल्याचे आढळून आले. नागरिकांनी घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे (Shrirampur Police Station) यांना कळविली तसेच रुग्णवाहिकेस पाचारण करून अपघातातील जखमी तरुणांना वैद्यकीय उपचारासाठी श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात हलविले.
कैलास लक्ष्मण धनवटे (वय 45, रा. सम्राटनगर सूतगिरणी) व सागर परदेशी (वय 35, रा. सुतगिरणी, श्रीरामपूर) अशी त्यांची नावे असून उपचारादरम्यान कैलास लक्ष्मण धनवटे या तरुणाचा मृत्यू (Youth Death) झाला असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली. अपघाताच्या घटनेनंतर चारचाकी वाहनचालक भरधाव वेगात फरार झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. याबात शहर पोलीस ठाण्यात अपघाताचा (Accident) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.
रेल्वे ओव्हर ब्रिजजवळ अपघात
सोमवारी दुपारी नेवासा (Newasa) रस्त्यावरील रेल्वे ओव्हर ब्रिजजवळ इंदिरानगरकडे जाताना दुचाकी स्वारांची (Bike Accident) समोरासमोर धडक झाली. या अपघातात वडाळा महादेव (Wadala Mahadev) येथील तरुणी जखमी झाली असून तिच्या दुचाकीच्या पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले. टाकळीभान (Takalibhan) येथील पती-पत्नी श्रीरामपूरकडे जात असताना हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. नागरिकांनी अशोकनगर पोलीस चौकी येथे घटनेची माहिती कळविल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम गोसावी यांनी अपघातस्थळी भेट देत दोघांनाही वैद्यकीय उपचारासाठी नातेवाईकांना माहिती देत त्यांच्या स्वाधीन केले. दिवसभर नेवासा रोडवर मोठी गर्दी असल्याने तसेच कांदा वाहतूकीची वाहने रेल्वे ओव्हर ब्रिज परीसरातील वजन काट्यासाठी उभी असल्याने बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
श्रीरामपूर-नेवासा रस्त्याचे (Shrirampur Newasa Road) चौपदरीकाणाचे काम सुरु असून ते पुर्णत्वाकडे आहे. रस्ता डांबरीकरण झाल्याने वानचधारक वेगात वाहने चालवितात. त्यामुळे अपघात होतात. हरेगाव फाटा (Haregav Phata) व अशोकनगर फाटा असल्याने येथे वाहनांची मोठी वर्दळ असते. या ठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे. परंतू त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष (Ignore) करण्यात येत आहे. या ठिकाणी गतिरोधक असता तर अपघात झाला नसता. प्रशासनाने लवकरात लवकर गतिरोधक बसवावेत तसेच या अपघातातील (Accident) संबंधित चारचाकी वाहनाचा तपास लावावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय महाराज परदेशी यांनी केली आहे.