अशोकनगरफाटा येथून वे-ब्रीजच्या तीन लोखंडी प्लेटांची चोरी

अशोकनगरफाटा येथून वे-ब्रीजच्या तीन लोखंडी प्लेटांची चोरी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरानजीक असलेल्या अशोकनगर फाटा या ठिकाणी असलेल्या एका वे-ब्रीज हाऊसमधून अज्ञात चोरट्यांनी 75 हजार रुपये किंमतीच्या वे-ब्रीजच्या तीन लोखंडी प्लेटा चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहरानजीक असलेल्या अशोकनगर फाटा याठिकाणी बाफना पब्लिक वे-ब्रीज या ठिकाणाहून 75 हजार रुपये किंमतीच्या तीन लोखंडी प्लेटा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.

याबाबत या वेब्रीजमधून लोखंडी प्लेटा चोरून नेल्या असल्याची माहिती कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मयुर बाजीराव सोनवणे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 1047/2022 प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक किरण पवार करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com