अशोक कारखान्याचा पहिला मिल रोलर विधिवत पूजन करून बसविला

अशोक कारखान्याचा पहिला मिल रोलर विधिवत पूजन करून बसविला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022-23 या गळीत हंगामासाठी पहिला मिल रोलर कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्याहस्ते तसेच माजी चेअरमन कोंडीराम उंडे व व्हा. चेअरमन भाऊसाहेब उंडे यांच्याहस्ते विधिवत पूजन करून बसविण्यात आला.

अशोक कारखान्याच्या आगामी सन 2022-23 च्या गळीत हंगामासाठीची हंगामपूर्व मशिनरी दुरुस्ती व देखभालीची कामे प्रगतीपथावर आहेत. यंदाचा गळीत हंगाम निर्धारीत वेळेत सुरू व्हावा, यादृष्टीने कारखाना व्यवस्थापन योग्य ती खबरदारी घेत आहे. मशिनरी देखभाल व दुरुस्तीसाठीची योग्य ती व्यवस्थाही करण्यात आली आहे. हंगामपूर्व कामासाठी कालबध्द कार्यक्रम आखण्यात आला असून त्यानुसार संबंधित अधिकारी व कर्मचारी अंमलबजावणी करीत आहेत.

मिल रोलर बसविण्याचा कार्यक्रम चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्याहस्ते झाला. यावेळी माजी चेअरमन कोंडीराम उंडे, व्हा. चेअरमन भाऊसाहेब उंडे, संचालक सोपानराव राऊत, मंजुश्री मुरकुटे, हिंमतराव धुमाळ, आदिनाथ झुराळे, बाबासाहेब आदिक, वाय. जी. बनकर, अमोल कोकणे, प्रफुल्ल दांगट, पुंजाहरी शिंदे, अच्युत बडाख, योगेश विटनोर, कार्यकारी संचालक संतोष देवकर, कामगार संचालक गिताराम खरात, अशोक पारखे, भाऊसाहेब बनसोडे, अधिकारी बाळासाहेब उंडे, प्रमोद बिडकर, लव शिंदे, कृष्णकांत सोनटक्के, सुनिल चोळके, भाऊसाहेब दोंड, सतिष झुगे, गोरख पटारे, विलास लबडे, बाबासाहेब तांबे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com