अशोक कारखाना निवडणूक, उमेदवारी अर्जांची आज छाननी

अशोक कारखाना निवडणूक, उमेदवारी अर्जांची आज छाननी
साखर कारखाना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांच्या छाननीस येथील शिवाजी रस्त्यावरील जिल्हा बँकेच्या कार्यालयात आज सोमवार (दि 20) रोजी सकाळी 11 वाजेपासून सुरुवात होणार आहे.

निवडणुकीसाठी 16 जानेवारी रोजी मतदान, 17 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. छाननीच्यावेळी उमेदवार किंवा त्यांचे सूचक यापैकी एकाच व्यक्तीला हजर राहता येणार आहे. छाननी कक्षात प्रवेश करताना उमेदवार अथवा सूचक यांनी छाननी स्लिप व स्वतःचे फोटो ओळखपत्र दाखविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

छाननीचे कामकाज गटनिहाय पद्धतीने करण्यात येणार असून उमेदवार अथवा सूचक यांनी ठरलेल्या वेळेतच याठिकाणी हजर राहणे आवश्यक आहे. दाखल अर्जासंबंधी हरकत असल्यास त्या त्या गटाची छाननी सुरू होण्यापूर्वी हरकत अर्ज लिखित स्वरूपात निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करावयाचे आहेत.

पढेगाव सर्वसाधारण उत्पादक गट सकाळी 11 ते 11.30, कारेगाव सर्वसाधारण उत्पादक गट सकाळी 11.30 ते 12, टाकळीभान सर्वसाधारण उत्पादक गट दुपारी 12 ते 12..30, वडाळा महादेव सर्वसाधारण उत्पादक गट दुपारी 12.30 ते 1, उंदिर्गाव सर्वसाधारण उत्पादक गट दुपारी 1 ते 1.30 उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था गटासाठी दुपारी 1.30 ते 2 आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिनिधी विमुक्त जाती भटक्या जमाती मागास प्रवर्ग इतर मागासवर्गीयांसाठी दुपारी 2 ते 3 अशा पद्धतीने नामनिर्देशन पत्र छाननीचे कामकाज येथील शिवाजी रस्त्यावरील जिल्हा बँकेच्या कार्यालयात होणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गणेश पुरी काम पाहत असून त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव कांदळकर, नामदेव खंडेराय, संजय पाटील हे मदत करीत आहेत. निवडणूक कार्यालयात सीसीटीव्ही इतर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, मतदारांसाठी गावागावांतच मतदान केंद्रे उभारण्यात येणार असल्याची माहिती श्री. पुरी यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com